सिद्दीकी फ्रान्सच्या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करतात. तसेच भारताच्या WION या वृत्तवाहिनीचे ते पाकिस्तान मधील ब्युरो चीफही आहेत.इस्लामाबाद ते रावलपिंडी या भागात काम करणारे सिद्दीकी बुधवारी टॅक्सीने विमानतळा कडे निघाले होते. त्याचवेळी अचानक १०-१२ जणांच्या एका टोळक्याने त्यांची टॅक्सी अडवली व त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण सिद्दीकीनी हुशारीने त्या टोळक्याच्या तावडीतून आपली सुटका केली. पाकिस्तानी लष्कराच्या धोरणांवर सिद्दीकी टीका करत असल्यानेच त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला असा आरोपही करण्यात येत आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews